तुमचा पगार १२ लाख ७५ हजार रुपये आहे…
आणि तरीही Tax ZERO असू शकतो!
बेकायदेशीर नाही… फसवणूक नाही…
सरकारच्या कायद्यानुसार!
नमस्कार मंडळी,
आजचा व्हिडिओ प्रत्येक Salaried म्हणजे पगाराच्या माध्यमातून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तीसाठी अतिशय महत्वाचा आहे
जर तुमचा पगार १२ लाख ७५ हजार रुपये पर्यंत असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा

नवीन टॅक्स रेजिम (New Tax Regime 2025)

सरकारने २०२५ पासून नवीन टॅक्स रेजिम मध्ये मोठा बदल केला आहे
तुमचं उत्पन्न वार्षिक ₹12 लाखांपर्यंत असेल तर ते करमुक्त होईल ज्याला FULL REBATE असं म्हणतात
Tax = ₹0

आणि त्यासाठी अट काय?
फक्त नवीन टॅक्स रेजिम निवडला पाहिजे.
आता आपण हे कस शक्य आहे ते एका आकडेमोडीद्वारे बघूया

₹12 लाख Salary Tax Calculation

समजा तुमचं वार्षिक उत्पन्न ज्याला Gross Salary म्हणतात ते ₹१२,७५,००० रु असेल.
तर त्यावर सगळ्यात आधी Standard Deduction 75,000 रु मिळेल.
ज्यामुळे तुमचं उत्पन्न १२ लाख उरेल.

आता यावर नवीन टॅक्स रेजिमच्या टॅक्स स्लॅबनुसार आकडेमोड केली जाईल.

वार्षिक उत्पन्न १२,७५,०००
स्टॅंडर्ड डिडक्शन (-) ७५,०००
उर्वरित उत्पन्न १२,००,०००
टॅक्स स्लॅब्स
स्लॅब १ (० - ४ लाख ०% टॅक्स) कर नाही
स्लॅब २ (४ - ८ लाख ५% टॅक्स) २०,०००
स्लॅब ३ (८ - १२ लाख १०% टॅक्स) ४०,०००
स्लॅब ४ (१२ - १६ लाख १५% टॅक्स)
स्लॅब ५ (१६ - २० लाख २०% टॅक्स)
स्लॅब ६ (१६ - २० लाख २०% टॅक्स)
स्लॅब ७ (२० - २४ लाख २५% टॅक्स)
स्लॅब ८ (२४ लाखांपेक्षा जास्त ३०% टॅक्स)
एकूण प्राप्तिकर ६०,०००
रिबेट (सवलत) (-) ६०,०००
अंतिम प्राप्तिकर -

  • इथे पहिल्या ४ लाख पर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स लागू होत नाही.
  • ४ ते ८ लाख पर्यंतच्या उत्पन्नावर ५% दराने २०,००० रु टॅक्स लागू होईल.
  • ८ ते १२ लाख पर्यंतच्या उत्पन्नावर १०% दराने ४०,००० रु टॅक्स लागू होईल.

म्हणजे एकूण १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ६०,००० रु टॅक्स लागू होईल.

पण नवीन टॅक्स रेजिम च्या नवीन नियमानुसार १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर जेवढा टॅक्स होईल त्यावर पूर्णपणे सवलत मिळेल.
त्यामुळे हा ६०,००० रु चा टॅक्स संपूर्णपणे माफ होईल आणि तुमचं उत्पन्न करमुक्त होईल.
पण अनेकजण इथेच चूक करतात.

  • जुना टॅक्स रेजिम निवडतात
  • टॅक्स स्लॅब नुसार गुंतवणूक आणि खर्च यांचं नियोजन करत नाहीत. त्यामुळे शक्य असूनही त्यांना हजारो रुपये Tax भरावा लागतो.

नवीन टॅक्स रेजिम कोणासाठी BEST आहे?


जर तुमची
  • 80C मध्ये investment कमी आहे
  • तुम्ही Home loan घेतलेलं नाही
  • तुम्ही घरभाडे म्हणजे House Rent टॅक्स च्या आकडेमोडीमध्ये दाखवत नाही
  • तुम्ही Simple salaried employee म्हणजे सामान्य पगारदार व्यक्ती आहात


तर तुम्हाला हा नवीन टॅक्स रेजिम १२,७५,००० रु पर्यंतच्या उत्पन्नावर सवलत मिळवून देईल.

उत्पन्नावरील Tax ZERO कसा करायचा?


त्यासाठी ३ महत्वाच्या स्टेप्स आहेत.

  • तुमच्या Employer ला किंवा कंपनीला New Tax Regime नुसार कराची आकडेमोड करायला सांगा
  • तुम्हाला मिळालेला फॉर्म १६ नीट तपासून बघा म्हणजे तुमच्या पगारावरील टॅक्सची आकडेमोड New Tax Regime नुसार केली आहे ते बघा
  • ITR म्हणजे Income Tax Returns किंवा आयकर विवरणपत्र भरताना New Tax Regime निवडा

थोडक्यात सांगायचं झालं तर
आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून तुमचं वार्षीक उत्पन्न १२,७५,००० पर्यंत जरी असेल तरी ते करमुक्त होऊ शकतं आणि
तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचं १२ लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त होईल कारण व्यावसायिक उत्पन्नावर स्टॅंडर्ड डिडक्शन जे ७५ हजार रु आहे ते मिळत नाही

मात्र, हे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी ITR म्हणजे Income Tax Returns किंवा आयकर विवरणपत्र भरावंच लागेल.

तर अशा प्रकारे तुम्ही आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून योग्य नियोजन करून १२,७५,००० पर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण टॅक्स वाचवू शकता.