मंडळी,
2025 मध्ये प्राप्तिकराच्या बाबतीत सगळ्यात मोठा गोंधळ म्हणजे – नवीन टॅक्स रेजिम
काहींचं मत आहे – “नवीन टॅक्स रेजिम सगळ्यांसाठी फायदेशीर आहे”
तर काही म्हणतात – “नवीन टॅक्स रेजिम पूर्ण फसवणूक!”
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण
बघणार आहोत –
तुमच्यासाठी नवीन टॅक्स रेजिम फायदेशीर आहे की तोट्याचं?
New Tax Regime म्हणजे काय?
2025 मध्ये
सरकारने नवीन टॅक्स रेजिम हे डिफॉल्ट केलं आहे.
म्हणजे काय तुम्ही जर स्वतःहून टॅक्स रेजिम निवडला नाही
तर तुमचा प्राप्तिकर नवीन टॅक्स रेजिम प्रमाणेच कापला जातो.
New Tax Regime मध्ये
- कमी Tax Slabs
- सोपं Calculation
- पण बहुतांश वजावटी आणि सवलती मिळत नाहीत
मात्र यात Standard Deduction मिळते.
Standard Deduction म्हणजे तुमच्या पगाराच्या रकमेतून ७५ हजारांची वजावट दिली जाते. आणि मग उरलेल्या रकमेवर प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते.
पण Standard Deduction फक्त नोकरी करणाऱ्यांनाच मिळतं व्यावसायिक उत्पन्नावर मिळत नाही.
नवीन टॅक्स रेजिम 2025 चे टॅक्स Slabs
New Tax Regime मध्ये
- जर तुमचं उत्पन्न ₹3 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यावर प्राप्तिकर भरावा लागत नाही.
- जर तुमचं उत्पन्न ₹3–6 लाख या दरम्यान असेल तर त्यावर 5% प्राप्तिकर भरावा लागतो.
- जर तुमचं उत्पन्न ₹6–9 लाख या दरम्यान असेल तर त्यावर 10% प्राप्तिकर भरावा लागतो.
- जर तुमचं उत्पन्न ₹9–12 लाख या दरम्यान असेल तर त्यावर 15% प्राप्तिकर भरावा लागतो.
- जर तुमचं उत्पन्न ₹12–15 लाख या दरम्यान असेल तर त्यावर 20% प्राप्तिकर भरावा लागतो
- जर तुमचं उत्पन्न ₹15 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यावर 30% प्राप्तिकर भरावा लागतो
इथं अजून एक महत्वाची गोष्ट अशी कि
तुमचं उत्पन्न १२ लाख रुपयांपर्यंत असेल तर त्यावर जो प्राप्तिकर होईल त्यावर तुम्हाला सवलत दिली जाते म्हणजे तुमचं १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं.
New Tax Regime कोणासाठी फायदेशीर आहे?
इथं ४-५ मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.
जर तुम्ही –
तर नवीन टॅक्स रेजिम तुम्हाला फायदेशीर ठरतो
कारण काय तर १२ लाख उत्पन्न असेल तरी प्राप्तिकर लागूच होत नाही.
नवीन टॅक्स रेजिम कोणासाठी तोट्याचं ठरू शकतं?
जर तुम्ही –
तर मात्र तुम्हाला New Tax Regime तोट्याचं ठरतं
कारण या मधील कुठलाच Tax-saving चे फायदे तुम्हाला मिळत नाहीत
मात्र इथं एक गडबड होऊ शकते ती अशी की
जर तुम्ही
- जुन्या टॅक्स रेजिम नुसार टॅक्स प्लॅनिंग करत असाल आणि
- तुम्ही तुमच्या कंपनीला तसं कळवलं नाही तर कंपनी तुमच्या उत्पन्नावरील टॅक्स ची आकडेमोड नवीन टॅक्स रेजिम नुसार करेल.
तसेच तुम्ही
- आयकर विवरणपत्र भरताना तुम्हाला हवा तो टॅक्स रेजिम निवडला नाही तर
- तुमच्या उत्पन्नावरील टॅक्स ची आकडेमोड नवीन टॅक्स रेजिम नुसार केली जाईल.
तेव्हा तुमच्या कंपनीला तुमच्या प्राप्तिकरासंबंधी माहिती देताना आणि ITR Filing करताना म्हणजे आयकर विवरणपत्र भरताना योग्य तो टॅक्स रेजिम निवडण्याची काळजी घ्या!

0 Comments