नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI च्या अमृत कलश (SBI Amrit Kalash Deposit) या योजनेची माहिती. या योजनेची मुदत खूप कमी आहे पण त्या तुलनेनी व्याजदर मात्र सगळ्यात जास्त आहे.

SBI Amrit Kalash Scheme

अमृत कलश योजनेची वैशिष्ट्ये - SBI Amrit Kalash Deposit features

SBI ची अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash Deposit) सामान्य एफडी सारखीच आहे. फक्त यात एका विशिष्ट कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते म्हणजे सामान्यपणे एफडी मध्ये गुंतवणूक करताना आपल्याला ७ दिवसापासून ते १० वर्षेपर्यंत कालावधीचा पर्याय असतो. या योजनेत मात्र ४०० दिवसांचाच कालावधी घ्यावा लागतो.

अमृत कलश योजनेची पात्रता - SBI Amrit Kalash Deposit eligibility

  • या योजनेत गुंतवणूकदाराला वयाची कुठलीही अट नाही म्हणजे कुठल्याही वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.
  • कुठलाही निवासी किंवा अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकतो. फक्त गुंतवणूक भारतीय रुपयांमध्येच करावी लागते.
  • तसंच अल्पवयीन व्यक्तीचं खातं चालवण्यासाठी कायदेशीर पालकाची गरज असते.

अमृत कलश योजनेची ठेवीच्या रकमेची मर्यादा आणि योजनेची मुदत - SBI Amrit Kalash Deposit limit and term

  • या योजनेअंतर्गत किमान १००० रु आणि जास्तीत जास्त २ कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते. मात्र त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करता येत नाही.
  • योजनेची मुदत ४०० दिवसांची आहे म्हणजे साधारण १ वर्ष १ महिना आणि ३ दिवस एवढी मुदत आहे.

अमृत कलश योजना व्याजाची माहिती - SBI Amrit Kalash Deposit interest

या योजनेचा व्याजदर सामान्य ठेवीदारांसाठी ७.१०% आहे आणि जेष्ठ नागरिकांसाठी ७.६०% आहे.

या योजनेत व्याज आपल्याला खालील प्रकारे मिळू शकत.

  • दर महिन्याला
  • दर तीन महिन्यांनी
  • दर सहा महिन्यांनी
  • मुदत पूर्ण झाल्यावर.

त्यामळे ही योजना ठेवीदारांना हवं तर मासिक उत्पन्न देऊ शकते. तिमाही उत्पन्न देऊ शकते किंवा मुदत पूर्ण झाल्यावर एकदम रक्कमही देऊ शकते.

अमृत कलश योजना प्राप्तिकरात सवलत - SBI Amrit Kalash Deposit tax benefit

या योजनेत कुठल्याही प्रकारे प्राप्तिकरात सवलत मिळत नाही. त्यामुळे योजनेत केलेली गुंतवणूक आणि मिळणार व्याज दोन्ही करपात्र आहे. मात्र जर आपलं उत्पन्न आधीच करपात्र असेल तरच कर भरावा लागतो अन्यथा कर भरावा लागत नाही.

म्हणजे आपल उत्पन्न अधिक वार्षिक योजनेत मिळालेलं व्याज ही बेरजेची रक्कम करपात्र होत असेल तर कर भरावा लागेल अन्यथा नाही.

यात वार्षिक व्याजाची रक्कम सामान्य ठेवीदारांसाठी ४० हजार रु पेक्षा जास्त होत असेल आणि जेष्ठ नागरिकांसाठी ५०,००० रु होत असेल तर टीडीएस कपात केली जाते. त्यामुळे टीडीएस कपात केली जाऊ नये असं वाटत असेल तर सामान्य ठेवीदारांनी फॉर्म १५जी आणि जेष्ठ नागरिकांसाठी फॉर्म १५एच भरून बँकेत द्यावा लागेल.

नवीन अपडेट
१ एप्रिल २०२५ पासून टीडीएस कपातीच्या मर्यादेमध्ये बदल होणार आहेत.
यात वार्षिक व्याजाची रक्कम सामान्य ठेवीदारांसाठी ५० हजार रु पेक्षा जास्त होत असेल आणि जेष्ठ नागरिकांसाठी १,००,००० रु होत असेल तर टीडीएस कपात केली जाते. त्यामुळे टीडीएस कपात केली जाऊ नये असं वाटत असेल तर सामान्य ठेवीदारांनी फॉर्म १५जी आणि जेष्ठ नागरिकांसाठी फॉर्म १५एच भरून बँकेत द्यावा लागेल.

अमृत कलश योजना मुदतपूर्व खातं बंद करणे आणि कर्ज - SBI Amrit Kalash Deposit premature withdrawal and loan facility

या योजनेत मुदतीपूर्वी खात बंद करणे आणि कर्ज मिळण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे.

  • खात मुदतीपूर्वी बंद केल्यास काही प्रमाणात दंड बसतो.
  • जर गुंतवणूक ५ लाखापर्यंत असेल तर मिळणाऱ्या व्याजाच्या ०,५% अर्धा टक्का एवढी रक्कम कापून घेतली जाते
  • गुंतवणूक ५ लाखापेक्षा जास्त असेल तर मिळणाऱ्या व्याजाच्या १% एवढी रक्कम कापून घेतली जाते.
  • जर खात ७ दिवसात बंद केलं तर कुठलंही व्याज मिळत नाही.
  • जर आपल्याला या खात्यावर कर्ज घ्यायचं असेल तर ठेवीच्या रकमेच्या ९०% पर्यंत मिळू शकतं.

मात्र मुदतीपूर्वी खात बंद करणे आणि कर्ज घेण्यासंबंधीचे नियम वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे खात चालू करताना या माहितीसाठी आपण बँकेशी संपर्क साधू शकता.

अमृत कलश योजनेत खातं उघडण्यासाठी - SBI Amrit Kalash Deposit account opening

या योजनेत आपण एसबीआय च्या कुठल्याही शाखेत जाऊन खात उघडू शकता तसंच इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल अँप्लिकेशन मधून सुद्धा खात उघडता येत.

अमृत कलश योजनेची शेवटची तारीख - SBI Amrit Kalash Deposit Last Date

या योजनेत खात उघडण्यासाठी ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खात ३१ मार्च २०२५ पर्यंत उघडावं लागेल.

तर मंडळी ही होती एसबीआय अमृत कलश (SBI Amrit Kalash Deposit) या योजनेची थोडक्यात माहिती. या योजनेचा लाभ आपण नक्की घेऊ शकता.