नमस्कार मंडळी, सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही भारत सरकारने बेटी बचाव बेटी पढाव या अभियाना अंतर्गत खास मुलींसाठी तयार केलेली योजना आहे ज्याचा प्रमुख हेतू मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय आणि त्यांच्या लग्नाच्या खर्चाची तरतूद करणे हा आहे. ही एक अल्पबचत योजना आहे जी अगदी छोट्या छोट्या बचतीतून सुद्धा चांगली रक्कम उभी करायला मदत करते.

Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना पात्रता (Sukanya Samriddhi Yojana Eligibility)

  • ही योजना फक्त मुलींसाठी आहे.
  • हे खाते पालकांकडून मुलीच्या नावाने उघडले जाऊ शकते जिचं वय खाते उघडण्याच्या तारखेला दहा वर्षे पूर्ण झालेले नाही म्हणजे मुलीचं वय १० वर्षांपेक्षा कमी आहे.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीच्या नावे एकच खाते असेल.
  • तसंच एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडले जाऊ शकते:
  • फक्त जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या बाबतीत दोन पेक्षा जास्त खाती उघडली जाऊ शकतात.
  • हे खातं आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडू शकतो.
  • तसंच मुलीच्या वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीचे पालक खात्याचे व्यवहार सांभाळू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना ठेवींचे नियम (Sukanya Samriddhi Yojana Deposit)

  • हे खात किमान २५० रु भरून चालू करता येतं.
  • या योजनेत दरवर्षी किमान २५० रु भरावेच लागतात आणि जास्तीत जास्त दीड लाख रु भरता येतात.
  • तसंच यात एका आर्थिक वर्षात एकरकमी किंवा अनेक हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सोय आहे.
  • या योजनेत खातं उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत पैसे भरावे लागतात.
  • एखाद्या वर्षी किमान रक्कम २५० रु भरली नाही तर ते खातं अकार्यक्षम किंवा बंद खातं मानलं जातं.
  • अशा प्रकारचं खात १५ वर्ष पूर्ण होण्याआधी पुन्हा चालू करता येत. त्यासाठी जेवढी वर्ष खात बंद असेल तेवढ्या वर्षांसाठी किमान रक्कम रु २५० + दंडाची रक्कम रु ५० भरावे लागतील. थोडक्यात, जेवढी वर्ष खात बंद असेल तेवढ्या वर्षांसाठी प्रतिवर्ष ३०० रु भरावे लागतील.
  • या योजनेत भरलेली रक्कम आयकर कलम ८० सी अंतर्गत करमुक्त आहे.

सुकन्या समृद्धी योजना व्याजाची माहिती (Sukanya Samriddhi Yojana interest)

  • या योजनेचा चालू व्याजदर ८.२% आहे आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे.
  • या योजनेत योग्य व्याज मिळवण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे भरणं आवश्यक आहे.
  • या योजनेत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जातं.
  • या योजनेत मिळविलेले व्याज प्राप्तिकर कायद्यानुसार करमुक्त आहे.

सुकन्या समृद्धी योजना खात्यातील पैसे काढण्याविषयी (Sukanya Samriddhi Yojana Withdrawal)

  • मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर किंवा १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातून काही रक्कम काढली जाऊ शकते.
  • ही रक्कम ज्या वर्षी मुलगी १८ वर्षांची होईल किंवा १० वी उत्तीर्ण होईल त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी उपलब्ध शिल्लक रकमेच्या ५०% पर्यंत काढली जाऊ शकते.
  • पैसे एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये काढता येतात. मात्र वर्षातून एकदाच असे पाच वर्ष काढता येतात त्यापेक्षा जास्त काढता येत नाहीत.

सुकन्या समृद्धी योजना मुदतपूर्व खात बंद करणे (Sukanya Samriddhi Yojana Premature closure)

खाते उघडल्यानंतर ५ वर्षांनी खालील अटींवर मुदतपूर्व बंद केले जाऊ शकते: -

  • खातेदाराच्या मृत्यू झाल्यास. या बाबतीत खातेदाराच्या मृत्यूच्या तारखेपासून पैसे परत मिळण्याच्या तारखेपर्यंत बचत खात्याचा व्याज दर लागू होईल
  • खातेधारकाला एखादा असाध्य रोग झाल्यामुळे पैशाची गरज पडल्यास
  • खाते चालवणाऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास ज्यामुळे पैसे भरण अशक्य आहे तर खातं बंद करता येतं.
  • अशाप्रकारे खात मुदतीपूर्वी बंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्र पासबुक आणि अर्जासह सादर करावी लागतील.

सुकन्या समृद्धी योजना मुदतपूर्तीनंतर काय होईल (Sukanya Samriddhi Yojana closure on maturity)

खातं सुरु केल्यापासून २१ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर खात्याची मुदत पूर्ण होईल त्यानंतर खातं बंद करता येईल.
तसंच, खातेदार मुलीच्या वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिचं लग्न ठरल्यास त्या खर्चासाठी खातं बंद करता येईल आणि सर्व रक्कम काढून घेता येईल.

सुकन्या समृद्धी योजना परतावा (Sukanya Samriddhi Yojana Calculator)

या योजनेचा व्याजदर ८.२% आहे. यात पहिली पैसे १५ वर्ष भरावे लागतील आणि २१ वर्षांनंतर रक्कम व्याजासकट परत मिळते.

वार्षिक रक्कम एकूण गुंतवणूक एकूण व्याज एकूण परतावा
१२,००० १,८०,००० ३,९४,५७० ५,७४,५७०
२४,००० ३,६०,००० ७,८९,१३९ ११,४९,१३९
३६,००० ५,४०,००० ११८,३७,०९ १७,२३,७०९
४८,००० ७,२०,००० १५,७८,२७८ २२,९८,२७८
६०,००० ९,००,००० १९,७२,८४८ २८,७२,८४८

सुकन्या समृद्धी योजना कागदपत्र (Sukanya Samriddhi Yojana Documents)

यात कागदपत्र म्हणून

  • खात उघडण्याचा अर्ज
  • मुलीचा जन्मदाखला
  • पालकांचं ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी)
  • पालकांचा पात्याचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, वीजबिल इत्यादी)

देता येईल.

तर मंडळी, ही होती सुकन्या समृद्धी योजनेची (Sukanya Samriddhi Yojana) माहिती. या योजनेत आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खातं उघडू शकता आणि आपल्या मुलीच भविष्य सुरक्षित करू शकता. तेव्हा तुम्हाला मुलगी असेल तर नक्की या योजनेत खातं सुरु करा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.