Marginal Relief चा फायदा कोणाला मिळतो? हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून तुमचं वार्षिक उत्पन्न १२,७५,००० रुपयांपेक्षा पेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला त्यावर एकही रुपया प्राप्तिकर भरावा लागणार नाही. 

पण हे कसं शक्य होईल? तर मंडळी, या विशेष सवलतीला मार्जिनल रिलीफ (Marginal Relief) असं म्हणतात. 

मार्जिनल रिलीफ (Marginal Relief) म्हणजे काय? 

मंडळी, आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून जे करदाते नवीन टॅक्स रेजिम निवडतील त्यांना आता नवीन नियमानुसार १२ लाखापर्यंत च्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही म्हणजेच त्यांचं १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होईल. 

आणि जर तुम्ही पगाराच्या किंवा पेन्शनच्या माध्यमातून पैसे मिळवत असाल तर तुम्हाला ७५ हजार रुपयांची अतिरिक्त वजावट मिळते ज्याला स्टॅंडर्ड डिडक्शन (Standard Deduction) म्हणतात. 

मात्र, करदात्यांचं उत्पन्न १२ लाखांपेक्षा एक रुपया जरी जास्त असेल तरी त्यांच्या उत्पन्नावर प्रत्येक टॅक्स स्लॅब गृहीत धरून त्याप्रमाणे प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते आणि त्यांना भरपूर टॅक्स भरावा लागतो. 

खालील टेबल मध्ये तुम्ही वेगवेगळ्या उत्पन्नासाठी किती प्राप्तिकर भरावा लागेल हे बघू शकता. या टेबलमध्ये तुम्ही चौथ्या टॅक्स स्लॅब पासून म्हणजेच १२ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल हे बघू शकता.

एकूण उत्पन्न = २५,००,०००
टॅक्स स्लॅब्स  स्लॅबवर प्राप्तिकर  एकूण प्राप्तिकर 
स्लॅब १ (०%) ० ते ४ लाख करमुक्त 
स्लॅब २ (५%) ४ लाख ते ८ लाख २०,००० रिबेट 
स्लॅब ३ (१०%) ८ लाख ते १२ लाख ४०,००० रिबेट 
स्लॅब ४ (१५%) १२ लाख ते १६ लाख ६०,००० १,२०,०००
स्लॅब ५ (२०%) १६ लाख ते २० लाख ८०,००० २,००,०००
स्लॅब ६ (२५%) २० लाख ते २४ लाख १,००,००० ३,००,०००
स्लॅब ७ (३०%) २४ लाखांहून जास्त ३०,००० ३,३०,०००


त्यामुळे करदात्यांची हीच अडचण लक्षात घेऊन प्राप्तिकर खात्याकडून एक विशेष सूट जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये करदात्यांचं उत्पन्न १२ लाखांपेक्षा जेवढं जास्त असेल तेवढीच रक्कम त्यांना प्राप्तिकर म्हणून भरावी लागेल. यालाच मार्जिनल रिलीफ(Marginal Relief) म्हणतात. 

हे समजून घेण्यासाठी आपण एक उदा बघूया. 

१२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त कस होईल?

या आकडेमोडीमध्ये स्टॅंडर्ड डिडक्शनची वजावट सुद्धा घेण्यात आली आहे. मात्र, इथं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल कि जर तुमचं उत्पन्न पगाराच्या माध्यमातून मिळत असेल किंवा तुमचं उत्पन्न पेन्शनच्या माध्यमातून मिळत असेल तरच तुम्हाला ही स्टॅंडर्ड डिडक्शनची वजावट मिळू शकते म्हणजे तुमच्या एकूण उत्पन्नातून थेट ७५ हजार रु वजा केले जातात आणि उरलेल्या रकमेवर प्राप्तिकराची आकडेमोड केली जाते. 

पण तुम्ही व्यावसायीक असाल तर तुम्हाला ही स्टॅंडर्ड डिडक्शनची वजावट मिळणार नाही. त्यामुळे जर तुमचं उत्पन्न पगारातून किंवा पेन्शन मधून मिळत असेल तर तुम्ही या टेबल मधील आकडेमोड वार्षिक उत्पन्न या रकान्यापासून सुरु झाली असं समजू शकता आणि तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्ही या टेबल मधील आकडेमोड वार्षिक करपात्र उत्पन्न या रकान्यापासून सुरु झाली असं समजू शकता.

आर्थिक वर्ष २०२५-२६
वार्षिक उत्पन्न ₹1,275,000.00
स्टॅंडर्ड डिडक्शन ₹75,000.00
गुंतवणूक / बचत ₹0.00
वार्षिक करपात्र उत्पन्न ₹1,200,000.00
स्लॅब १ (०%) ० ते ४ लाख ₹0.00
स्लॅब २ (५%) ४ लाख ते ८ लाख ₹20,000.00
स्लॅब ३ (१०%) ८ लाख ते १२ लाख ₹40,000.00
स्लॅब ४ (१५%) १२ लाख ते १६ लाख ₹0.00
स्लॅब ५ (२०%) १६ लाख ते २० लाख ₹0.00
स्लॅब ६ (२५%) २० लाख ते २४ लाख ₹0.00
स्लॅब ७ (३०%) २४ लाखांहून जास्त ₹0.00
स्लॅबनुसार प्राप्तिकर ₹60,000.00
करात सवलत (८७ए) ₹60,000.00
₹0.00
उपकर ४% ₹0.00
प्राप्तिकर ₹0.00


तर या टेबलच्या दुसऱ्या कॉलम मध्ये दाखवल्याप्रमाणे तुमचं उत्पन्न १२ लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला पहिल्या टॅक्स स्लॅब नुसार पहिल्या ४ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही. 

दुसऱ्या टॅक्स स्लॅब नुसार तुमचं उत्पन्न ४ लाखांपेक्षा जास्त आणि ८ लाखांपर्यंत असेल तर त्यावर ५% टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे या उदाहरणानुसार उरलेल्या ४ लाखांच्या उत्पन्नावर ५% म्हणजे २० हजार रुपये टॅक्स होईल. 

तिसऱ्या टॅक्स स्लॅब नुसार तुमचं उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त आणि १२ लाखांपर्यंत असेल तर त्यावर १०% टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे या उदाहरणानुसार उरलेल्या ४ लाखांच्या उत्पन्नावर १०% म्हणजे ४० हजार रुपये टॅक्स होईल. 

मात्र आपली टॅक्सची आकडेमोड इथेच संपते कारण आपलं उत्पन्न १२ लाख आहे त्यामुळे आपल्याला पुढील टॅक्स स्लॅब मध्ये जायची गरजच पडणार नाही. 

आता आपलं उत्पन्न १२ लाख आहे त्यामुळे आपल्याला नवीन टॅक्स रेजिममध्ये सुद्धा कलम ८७ए अंतर्गत १२ लाखाच्या रकमेवर जेवढा टॅक्स असेल तेवढी सूट मिळते. आणि आपला टॅक्स ६० हजार होत असल्यामुळे आपल्याला ६० हजार एवढी रिबेट किंवा सूट मिळेल. त्यामुळे आपलं उत्पन्न करमुक्त होईल. 

आता आपण दुसरं उदाहरण बघूया. 

Marginal Relief चा फायदा कोणाला मिळतो?

आपण असं समजूया कि आपलं उत्पन्न १२ लाखांपेक्षा थोडं जास्त म्हणजे १२,००,१०० रु आहे. 

आता जर आपलं उत्पन्न १२ लाखांपेक्षा थोडजरी जास्त असेल तरी आपल्या उत्पन्नावर प्राप्तिकराची आकडेमोड अगदी पहिल्या टॅक्स स्लॅबपासून केली जाते आणि त्यानुसार जी काही टॅक्स ची रक्कम असेल ती आपल्याला भरावी लागते. 

आता या उदाहरणाप्रमाणे आपलं उत्पन्न १२,००,१०० रु आहे त्यामुळे नवीन टॅक्स रेजिम नुसार पहिल्या ४ लाखांच्या उत्पन्नावर आपल्याला कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही. म्हणजे उरले ८,००,१००रु. 

आता दुसऱ्या टॅक्स स्लॅब नुसार ४ लाखांपेक्षा जास्त आणि ८ लाखांपर्यंत च्या उत्पन्नाच्या रकमेवर म्हणजे त्यातील ४ लाखांच्या रकमेवर ५% म्हणजे २० हजार रु टॅक्स होईल. म्हणजे उरले ४००,१०० रु. 

तिसऱ्या टॅक्स स्लॅब नुसार तुमचं उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त आणि १२ लाखांपर्यंत असेल तर त्यावर १०% टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे या उदाहरणानुसार उरलेल्या ४ लाखांच्या उत्पन्नावर १०% म्हणजे ४० हजार रुपये टॅक्स होईल. 

आता चौथ्या टॅक्स स्लॅब नुसार १२ लाखांपेक्षा जास्त आणि १६ लाखांपर्यंत च्या उत्पन्नाच्या रकमेवर म्हणजे उरलेल्या १०० रुपयांवर १५% म्हणजे १५ रु टॅक्स होईल. 

म्हणजे आपल्या १२,००,१०० रु उत्पन्नावर आपल्याला ६०,०१५ रु टॅक्स होईल. त्यावर उपकर ४% लागू होईल जो २४०१ रु होतो. त्यामुळे आपल्या टॅक्स ची रक्कम ६२,४१६ रु होईल. 

आता तुमच्या लक्षात आलं असेल कि १२ लाख उत्पन्न असेल तर शून्य रुपये टॅक्स आणि १२ लाखांपेक्षा फक्त १०० रु उत्पन्न जास्त असल्यामुळे आपल्याला ६२,४१६ रु एवढा टॅक्स भरावा लागतो. जे करदात्यांचं खूप मोठं नुकसान आहे असं म्हणावं लागेल. 

उत्पन्न  प्राप्तिकर
१२,००,००० रुपये  शून्य रुपये 
१२,००,१०० रुपये  ६२,४१६ रुपये 


याविषयी बहुतेक करदात्यानी तक्रारीचा सूर दर्शवला आणि त्यामुळेच प्राप्तिकर खात्याकडून एक विशेष सवलत देण्यात आली जिला मार्जिनल रिलीफ असं म्हणतात. आता आपण बघूया कि हे मार्जिनल रिलीफ कसं फायदेशीर आहे. 

मार्जिनल रिलीफ (Marginal Relief) लागू कसं होतं?

तुम्ही आता स्क्रीनवर जे टेबल बघत आहात त्यामध्ये २ प्रकारची आकडेमोड दाखवली आहे. 

दुसऱ्या कॉलम मध्ये जर तुमचं उत्पन्नावर टॅक्स स्लॅब्स प्रमाणे प्राप्तिकराची आकडेमोड कशी होईल ते दाखवलं आहे. 

तिसऱ्या कॉलम मध्ये जर मार्जिनल रिलीफ (Marginal Relief) चा फायदा मिळाला तर त्यावर प्राप्तिकराची आकडेमोड कशी होईल ते दाखवलं आहे. 

मार्जिनल रिलीफच्या नियमानुसार जर तुमचं उत्पन्न १२ लाखांपेक्षा जास्त होत असेल तर त्या जास्तीच्या उत्पन्नाच्या रकमेएवढाच टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. 

आर्थिक वर्ष २०२५-२६ मार्जिनल रिलीफ
वार्षिक उत्पन्न ₹1,275,100.00 ₹1,275,100.00
स्टॅंडर्ड डिडक्शन ₹75,000.00 ₹75,000.00
गुंतवणूक / बचत ₹0.00 ₹0.00
वार्षिक करपात्र उत्पन्न ₹1,200,100.00 ₹1,200,100.00
स्लॅब १ (०%) ० ते ४ लाख ₹0.00 ₹0.00
स्लॅब २ (५%) ४ लाख ते ८ लाख ₹20,000.00 ₹20,000.00
स्लॅब ३ (१०%) ८ लाख ते १२ लाख ₹40,000.00 ₹40,000.00
स्लॅब ४ (१५%) १२ लाख ते १६ लाख ₹15.00 ₹15.00
स्लॅब ५ (२०%) १६ लाख ते २० लाख ₹0.00 ₹0.00
स्लॅब ६ (२५%) २० लाख ते २४ लाख ₹0.00 ₹0.00
स्लॅब ७ (३०%) २४ लाखांहून जास्त ₹0.00 ₹0.00
स्लॅबनुसार प्राप्तिकर ₹60,015.00 ₹60,015.00
करात सवलत (८७ए) ₹0.00 ₹59,915.00
₹60,015.00 ₹100.00
उपकर ४% ₹2,401.00 ₹4.00
प्राप्तिकर ₹62,416.00 ₹104.00


हे समजण्यासाठी तुम्ही हा तिसरा कॉलम बघू शकता. या मध्ये वार्षिक उत्पन्न १२,७५,१०० रु एवढं दाखवण्यात आलं आहे. यातून आधी ७५ हजार रु स्टॅंडर्ड डिडक्शन होईल. आता उरलेल्या १२,००,१०० रु या उत्पन्नावर आपल्याला पहिल्या टॅक्स स्लॅब नुसार पहिल्या ४ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एकही रुपया टॅक्स भरावा लागत नाही. 

दुसऱ्या टॅक्स स्लॅब नुसार तुमचं उत्पन्न ४ लाखांपेक्षा जास्त आणि ८ लाखांपर्यंत असेल तर त्यावर ५% टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे या उदाहरणानुसार पुढील ४ लाखांच्या उत्पन्नावर ५% म्हणजे २० हजार रुपये टॅक्स होईल. 

तिसऱ्या टॅक्स स्लॅब नुसार तुमचं उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त आणि १२ लाखांपर्यंत असेल तर त्यावर १०% टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे या उदाहरणानुसार उरलेल्या ४ लाखांच्या उत्पन्नावर १०% म्हणजे ४० हजार रुपये टॅक्स होईल. 

आता चौथ्या टॅक्स स्लॅब नुसार १२ लाखांपेक्षा जास्त आणि १६ लाखांपर्यंत च्या उत्पन्नाच्या रकमेवर म्हणजे उरलेल्या १०० रुपयांवर १५% म्हणजे १५ रु टॅक्स होईल. 

म्हणजे आपल्या १२,००,१०० रु उत्पन्नावर आपल्याला ६०,०१५ रु टॅक्स होईल. 

पण मार्जिनल रिलीफ (Marginal Relief) च्या नियमानुसार तुमचं उत्पन्न १२ लाखांपेक्षा जेवढं जास्त होईल तेवढीच रक्कम टॅक्स म्हणून धरली जाईल. म्हणजे आपल्या या उदाहरणानुसार १२ लाखांपेक्षा फक्त १०० रु जास्त आहेत  म्हणून १२,००,१०० रु वर जरी ६०,०१५ रु टॅक्स झाला असेल तरी मार्जिनल रिलीफ च्या नियमानुसार आपल्याला १०० रु एवढाच टॅक्स द्यावा लागेल. त्यामुळे प्राप्तिकराच्या रकमेत ५९,९१५ एवढ्या रकमेची बचत होईल. 

मात्र, १०० रु टॅक्स च्या रकमेवर आपल्याला ४% उपकर मात्र भरावा लागतो जो या उदाहरणाप्रमाणे ४ रु होईल. म्हणजे एकूण टॅक्स १०४ रु भरावा लागेल. 

मार्जिनल रिलीफ (Marginal Relief) ची कमाल मर्यादा 

मात्र या मार्जिनल रिलीफला सुद्धा एक कमाल मर्यादा असते. ही मर्यादा स्टॅंडर्ड डिडक्शन लागू होत असेल तर म्हणजे नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांसाठी १३,४५,५८८ रु एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे आणि स्टॅंडर्ड डिडक्शन लागू होत नसेल तर म्हणजे व्यावसायिक करदात्यांसाठी १२,७०,५८८ रु एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे. 

पात्र करदाते  मर्यादा 
नोकरदार/पेन्शनर करदाते  १३,४५,५८८ रुपये 
व्यावसायिक करदाते  १२,७०,५८८ रुपये 

वार्षिक उत्पन्नावर मार्जिनल रिलीफचा फायदा

आता आपण बघूया अजून काही रकमा ज्यांना वार्षिक उत्पन्नावर मार्जिनल रिलीफचा फायदा मिळू शकतो. 

करपात्र उत्पन्न निव्वळ प्राप्तिकर  मार्जिनल रिलीफ रिबेट (कलम ८७ए)
रु १२,००,००० लागू होत नाही  लागू होत नाही  रु ६०,०००
रु १२,००,१०० रु ६०,०१५ रु १००  रु ५९,९१५
रु १२,२०,००० रु ६३,००० रु २०,०००   रु ४३,०००
रु १२,४५,००० रु ६६,७५० रु ४५,०००   रु २१,७५०
रु १२,६५,००० रु ६९,७५० रु ६५,०००   रु ४,७५०
रु १२,७०,५८८ रु ७०,५८८ रु ७०,५८८   रु ०


जर तुमचं उत्पन्न १२ लाख असेल तर तुम्हाला टॅक्स आणि मार्जिनल रिलीफ दोन्ही लागू होत नाही कारण १२ लाखपर्यंतच्या उत्पन्नावर नवीन टॅक्स रेजिम नुसार जी टॅक्सची रक्कम येईल त्यावर रिबेट म्हणजे सवलत मिळते आणि त्यामुळे कुठलाही टॅक्स भरावा लागत नाही. 

जर तुमचं उत्पन्न १२,००,१०० रु असेल तर त्यावर टॅक्स स्लॅबनुसार प्राप्तिकर ६०,०१५ रु होईल. म्हणजे पहिल्या १२ लाखांपर्यंत च्या रकमेवर ६० हजार आणि उरलेल्या १०० रु वर १५% म्हणजे १५ रु = ६०,०१५ रु टॅक्स होईल. पण या उत्पन्नाच्या रकमेवर मार्जिनल रिलीफ चा फायदा मिळू शकतो. त्यामुळे १२ लाख रु पेक्षा जेवढी जास्त उत्पन्नाची रक्कम आहे तेवढाच कर आकारला जाईल आणि उरलेल्या रकमेवर आयकर कलम ८७ए अंतर्गत सवलत मिळेल. इथे १०० रु एवढी रक्कम १२ लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून १०० रु प्राप्तिकराची रक्कम असेल  आणि ५९,९१५ रु एवढी आपली टॅक्स मध्ये बचत होईल. मात्र या १०० रु वर ४% उपकर म्हणजे ४ रु लागू होतील म्हणून एकूण १०४ रु प्राप्तिकर भरावा लागेल. 

जर तुमचं उत्पन्न १२,२०,००० रु असेल तर त्यावर टॅक्स स्लॅबनुसार प्राप्तिकर ६३,००० रु होईल. म्हणजे पहिल्या १२ लाखांपर्यंत च्या रकमेवर ६० हजार आणि उरलेल्या २०,००० रु वर १५% म्हणजे ३,००० रु = ६३,००० रु टॅक्स होईल. इथे २०,००० रु एवढी रक्कम १२ लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून २०,००० रु प्राप्तिकराची रक्कम असेल आणि ४३,००० रु एवढी आपली टॅक्स मध्ये बचत होईल. मात्र या २०,००० रु वर ४% उपकर म्हणजे ८०० रु लागू होतील म्हणून एकूण १५,८०० रु प्राप्तिकर भरावा लागेल. 

जर तुमचं उत्पन्न १२,४५,००० रु असेल तर त्यावर टॅक्स स्लॅबनुसार प्राप्तिकर ६६,७५० रु होईल. म्हणजे पहिल्या १२ लाखांपर्यंत च्या रकमेवर ६० हजार आणि उरलेल्या ४५,००० रु वर १५% म्हणजे ६,७५० रु = ६६,७५० रु टॅक्स होईल. इथे ४५,००० रु एवढी रक्कम १२ लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून ४५,००० रु प्राप्तिकराची रक्कम असेल आणि २१,७५० रु एवढी आपली टॅक्स मध्ये बचत होईल. मात्र या ४५,००० रु वर ४% उपकर म्हणजे १,८०० रु लागू होतील म्हणून एकूण ४६,८०० रु प्राप्तिकर भरावा लागेल. 

जर तुमचं उत्पन्न १२,६५,००० रु असेल तर त्यावर टॅक्स स्लॅबनुसार प्राप्तिकर ६९,७५० रु होईल. म्हणजे पहिल्या १२ लाखांपर्यंत च्या रकमेवर ६० हजार आणि उरलेल्या ६५,००० रु वर १५% म्हणजे ९,७५० रु = ६९,७५० रु टॅक्स होईल. इथे ६५,००० रु एवढी रक्कम १२ लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून ६५,००० रु प्राप्तिकराची रक्कम असेल आणि ४,७५० रु एवढी आपली टॅक्स मध्ये बचत होईल. मात्र या ६५,००० रु वर ४% उपकर म्हणजे २,६०० रु लागू होतील म्हणून एकूण ६७,६०० रु प्राप्तिकर भरावा लागेल. 

तुमचं उत्पन्न १२,७०,५८८ रु असेल तर त्यावर टॅक्स स्लॅबनुसार प्राप्तिकर ७०,५८८ रु होईल. म्हणजे पहिल्या १२ लाखांपर्यंत च्या रकमेवर ६० हजार आणि उरलेल्या ७०,५८८ रु वर १५% म्हणजे १०,५८८ रु = ७०,५८८ रु टॅक्स होईल. पण या उत्पन्नाच्या रकमेवर सुद्धा मार्जिनल रिलीफ चा फायदा मिळू शकतो. इथे ७०,५८८ रु एवढी रक्कम १२ लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून ७०,५८८ रु प्राप्तिकराची रक्कम असेल आणि त्यावर ४% उपकर म्हणजे २८२४ रु म्हणून एकूण ७३,४१२ रु प्राप्तिकर भरावा लागेल. या उत्पन्नाच्या रकमेवर मार्जिनल रिलीफ चा फायदा मिळाला असला तरी प्राप्तिकरात बचत होत नाही कारण १२,७०,५८८ रु ही उत्पन्नाची रक्कम मार्जिनल रिलीफची कमाल मर्यादा आहे. 

त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर जर मार्जिनल रिलीफचा नियम लावून बघितला तर मार्जिनल रिलीफ (Marginal Relief) नुसार होणाऱ्या कराची रक्कम नियमित टॅक्स स्लॅबनुसार होणाऱ्या कराच्या रकमेपेक्षा जास्त होते. म्हणून नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांसाठी १३,४५,५८८ रु आणि व्यावसायिक करदात्यांसाठी १२,७०,५८८ रु या रकमेपेक्षा जास्त उत्पन्नाच्या रकमेसाठी नियमित टॅक्स स्लॅब च्या उपयोग केला जातो. 

तर मंडळी आज आपण Marginal Relief चा फायदा कोणाला मिळतो आणि कसा मिळतो याची माहिती बघितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. माहिती आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. धन्यवाद.