मंडळी, Short Term Capital Gain हा शेअर्स मध्ये केलेल्या खरेदी आणि विक्री मधून मिळणारा एक उत्पन्नाचा प्रकार आहे. Short Term Capital Gain साठी एक विशिष्ट प्रकारचा टॅक्स लागू केला जातो त्याला Short Term Capital Gain Tax म्हणतात. आपण आज याच टॅक्स बद्दलची माहिती घेणार आहोत.

Capital Gain म्हणजे काय?

मंडळी, कॅपिटल गेन म्हणजे तुम्ही जेव्हा शेअर्स विकत घेता आणि काही दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी ते शेअर्स विकता, तेव्हा त्या व्यवहारामध्ये जो फायदा होतो त्याला Capital Gain असे म्हणतात. थोडक्यात, शेअरची खरेदीची किंमत आणि शेअरची विक्रीची किंमत यामध्ये जो फरक असतो; त्यातून जर फायदा होत असेल तर त्याला Capital Gain असे म्हणतात.

कॅपिटल गेन चे प्रकार

कॅपिटल गेन चे प्रामुख्याने दोन प्रकार असतात
  • शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि
  • लॉन्ग टर्म कॅपिटल गेन
आज आपण Short Term Capital Gain ची माहिती घेणार आहोत.

Short Term Capital Gain म्हणजे काय?

Short Term Capital Gain म्हणजे तुम्ही शेअर्स घेऊन एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधी विकलेत तर त्यावर होणाऱ्या फायद्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असे म्हणतात.

उदाहरणार्थ,
जर तुम्ही
१ एप्रिल २०२५ या दिवशी १०० रु प्रति शेअर या किमतीला १०० शेअर्स विकत घेतलेत आणि ते शेअर्स तुम्ही १ मे २०२५ या दिवशी १०५ रुपयाला विकलेत.
तर या व्यवहारामध्ये तुम्हाला प्रति शेअर ५ रुपयांचा फायदा होतो म्हणजे एकूण फायदा ५०० रुपये होतो. या फायद्याच्या रकमेला Short Term Capital Gain असे म्हणतात.

या व्यवहारात शेअर्स खरेदी केल्यानंतर एक महिन्यांनी विकलेले आहेत म्हणजे एक वर्ष पूर्ण होण्याआधी विकलेले आहेत म्हणून त्याला Short Term Capital Gain असं म्हणता येईल.

Short Term Capital Gain मध्ये समाविष्ट होणारे उत्पन्नाचे प्रकार?

Short Term Capital Gain मध्ये खालील प्रकारच्या उत्पन्नाचा समावेश होतो.
  • शेअर मार्केटमध्ये खरेदी आणि विक्री केली असेल तर त्या व्यवहारात होणारा फायदा
  • म्युच्युअल फंडाद्वारे शेअर्समध्ये खरेदी आणि विक्री केली असेल तर त्या व्यवहारात होणारा फायदा
  • एसआयपी द्वारे शेअर्समध्ये खरेदी आणि विक्री केली असेल तर त्या व्यवहारात होणारा फायदा
फक्त इथे नियम एकच आहे की खरेदी आणि विक्रीच्या तारखेमध्ये एक वर्षापेक्षा कमी अंतर असावं. म्हणजे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडातली गुंतवणूक (जी शेअर्समध्ये केलेली असेल) आणि खरेदी करून एक वर्षाच्या आत तिची विक्री केली असेल तर त्यामध्ये होणाऱ्या फायद्याच्या रकमेला Short Term Capital Gain असं म्हणता येईल.

Short Term Capital Gain वर किती टक्के टॅक्स आकारला जातो?

मंडळी, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर भरावा लागणारा टॅक्स म्हणजे Short Term Capital Gain Tax.
त्यामुळे जर तुम्ही शेअर्स २३ जुलै २०२४ या तारखेच्या आधी विकले असतील तर तुम्हाला १५% टॅक्स शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून भरावा लागेल.

उदाहरणार्थ - १ एप्रिल २०२४ या दिवशी १०० रु प्रति शेअर या किमतीला १०० शेअर्स विकत घेतले आणि ते शेअर्स १ मे २०२४ या दिवशी १०५ रुपयाला विकले.
तर या व्यवहारामध्ये प्रति शेअर ५ रुपयांचा फायदा होतो. म्हणजे एकूण ५०० रुपयांचा फायदा होतो.
आता हा व्यवहार २३ जुलै २०२४ च्या आधी केला असल्यामुळे त्यावर १५% टॅक्स भरावा लागेल. म्हणजे पाचशे रुपयाच्या १५% म्हणजे ७५ रुपये टॅक्स Short Term Capital Gain Tax म्हणून भरावा लागेल
आणि जर शेअर्स २३ जुलै २०२४ पासून नंतर विकले असतील तर तुम्हाला २०% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून भरावा लागेल.

म्हणजे आत्ताच्या उदाहरणानुसार तुम्हाला जो ५०० रुपयांचा फायदा म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला आहे त्यावर २०% म्हणजे शंभर रुपये टॅक्स शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून भरावा लागेल.

Short Term Capital Gain Tax आणि सामान्य उत्पन्नावरील टॅक्स

मंडळी सामान्य उत्पन्नावरील टॅक्स म्हणजे तुमचं जे
  • पगाराचे उत्पन्न असेल,
  • पेन्शनचं उत्पन्न असेल,
  • व्यवसायातून मिळणारं उत्पन्न असेल,
  • घर भाड्यातून मिळणारं उत्पन्न असेल,
  • बँकेच्या ठेवींवरील मिळणारं व्याज किंवा
  • शेअर्स वर मिळणारी डिव्हीडंड ची रक्कम असेल
यावर प्राप्तिकर विभागाने दिलेल्या टॅक्स स्लॅब नुसार टॅक्स आकारला जातो. आत्ता स्क्रीनवर तुम्हाला हे टॅक्स लॅब दिसत असतील. या टॅक्स स्लॅब मध्ये उत्पन्नाच्या काही मर्यादा दिलेल्या असतात त्या दरम्यान जर तुमचे उत्पन्न असेल तर तेवढे टक्के टॅक्स तुम्हाला भरावा लागतो. यामध्ये नवीन टॅक्स रेजिम आणि जुना टॅक्स रेजिम असे दोन प्रकार सुद्धा असतात; ज्यामुळे तुमच्या टॅक्सच्या रकमेत बराच फरक पडू शकतो.

Short Term Capital Gain वर 87a अंतर्गत रिबेट मिळतो का?

मंडळी तुम्ही कदाचित ऐकलं असेल की आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे. पण या संदर्भात काही महत्त्वाचे नियम लक्षात घ्यावे लागतील -
  • नवीन टॅक्स रिजीमनुसार पहिल्या चार लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे.
  • त्यानंतर ४ लाख ते १२ लाखां दरम्यान च जे उत्पन्न असतं त्यावर होणारा टॅक्स मोजला जातो आणि त्या टॅक्स वर आपल्याला रिबेट दिला जातो आणि हा रिबेट आपल्याला आयकर कलम 87a अंतर्गत दिला जातो.
इथं पहिल्या चार लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे कारण ही नवीन टॅक्स रेजिम मधली प्राथमिक मर्यादा आहे ज्याला बेसिक एक्झमशन लिमिट असं म्हणतात. त्यामुळे 87 ए या कलमांतर्गत कुठल्याही टॅक्स रेजीम अंतर्गत मग जुन्या टॅक्स रेजीम अंतर्गत असो किंवा नव्या टॅक्स रेजीम अंतर्गत असो, बेसिक एक्झमशन लिमिट (basic exemption limit) पर्यंत चे उत्पन्न करमुक्त असतं त्यामुळे जर तुमचं इतर उत्पन्न आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मिळून
  • जुन्या टॅक्स रेजीम नुसार अडीच लाख आणि
  • नवीन टॅक्स रेजीम नुसार चार लाखांपर्यंत असेल
तर तुम्हाला त्यावर 87a या कलमाचा फायदा मिळू शकेल. मात्र त्या पुढील उत्पन्नावर जरी तुम्हाला 87a या आयकर कलमाचा चा फायदा मिळत असला तरी Short Term Capital Gain वर हा फायदा मिळणार नाही.

Short Term Capital Gain वर टीडीएस लागू होतो का?

मंडळी, टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. थोडक्यात, कुठल्याही प्रकारचे उत्पन्न जे एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर त्यावर एक प्रकारचा आगाऊ कर आकारला जातो त्याला टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स असं म्हणतात. टीडीएस सामान्यपणे
  • बँकेच्या ठेवींच्या व्याजाच्या उत्पन्नावर,
  • पगाराच्या उत्पन्नावर
  • घर भाड्यातून मिळणारे उत्पन्नावर,
  • फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सी चार्जेस
आणि अशा बऱ्याच प्रकारच्या उत्पन्नावर लागू केला जातो मात्र, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर अजून तरी कुठल्याही प्रकारचा टीडीएस लागू केला जात नाही.

Short Term Capital Gain Tax ची आकडेमोड

मंडळी, आता आपण बघूया शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स वेगवेगळ्या परिस्थितीत कशाप्रकारे लागू केला जातो

उदाहरण १ -

मंडळी मगाशी आपण बघितल्याप्रमाणे जर तुमचं इतर उत्पन्न अधिक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ची रक्कम मिळून बेसिक एक्झमशन लिमिट पेक्षा कमी होत असेल तर त्यावर कुठलाही टॅक्स आकारला जात नाही

इतर उत्पन्न शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एकूण उत्पन्न
जुना टॅक्स रेजीम २,४०,००० १०,००० २,५०,००० करमुक्त
नवीन टॅक्स रेजीम २,९०,००० १०,००० ३,००,००० करमुक्त


याची आकडेमोड तुम्ही आत्ता स्क्रीनवर बघू शकता. या उदाहरणामध्ये जुन्या टॅक्स रेजीम साठी आणि नवीन टॅक्स रेजीम साठी दोन्ही साठी ची आकडेमोड दिली आहे आणि दोन्ही टॅक्स रेजीम नुसार एकूण उत्पन्न म्हणजे इतर उत्पन्न अधिक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन चं उत्पन्न मिळून बेसिक एक्झमशन लिमिट पर्यंत असल्यामुळे इथे टॅक्स लागू होत नाही.

उदाहरण २ -

समजा तुमचे इतर उत्पन्न बेसिक एक्झमशन लिमिट पेक्षा जास्त आहे म्हणजे पाच लाख रुपये आहे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन १०,००० रुपये आहे तर याबाबतीत तुम्हाला इतर उत्पन्नाच्या रकमेवर म्हणजे पाच लाख रुपयांवरती जुन्या आणि नव्या दोन्ही रेजीम अंतर्गत शून्य रु टॅक्स भरावा लागेल.
मात्र शॉर्ट टर्म कॅपिटल गेन च्या उत्पन्नावर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने टॅक्स आकारला जाईल.

यामध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन २३ जुलै २०२४ च्या आधी झाला असेल तर त्या उत्पन्नावर १५% टॅक्स आकारला जाईल. म्हणजे १०,००० रुपयांवरती १५% या हिशोबाने १,५०० रुपये टॅक्स भरावा लागेल

आणि जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन २३ जुलै २०२४ च्या नंतर झाला असेल तर त्या उत्पन्नावर २०% टॅक्स आकारला जाईल. म्हणजे १०,००० रुपयांवरती २०% या हिशोबाने २००० रुपये टॅक्स भरावा लागेल.

उदाहरण ३ -

आता समजा तुमचं इतर उत्पन्न बेसिक एक्झमशन लिमिट पेक्षा थोडसं कमी आहे. म्हणजे जुन्या टॅक्स रेजिनुसार २,४०,००० रुपये आहे आणि नवीन टॅक्स रेजिनुसार २,९०,००० रुपये आहे. आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन २०००० रुपये आहे.
तर याबाबतीत आकडेमोड कशी होईल ते बघूया.

याबाबतीत तुमचं इतर उत्पन्न अधिक कॅपिटल गेन मधील पहिले दहा हजार रुपये मिळून एकूण उत्पन्न बेसिक एक्झामशन लिमिट एवढं होत आहे म्हणजे जुन्या टॅक्स रिजीनुसार अडीच लाख रुपये आणि नवीन टॅक्स रिजीनुसार तीन लाख रुपये त्यामुळे या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही.

इतर उत्पन्न शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एकूण उत्पन्न
जुना टॅक्स रेजीम २,४०,००० १०,००० २,५०,००० करमुक्त
नवीन टॅक्स रेजीम २,९०,००० १०,००० ३,००,००० करमुक्त


मात्र कॅपिटल गेन च उरलेलं दहा हजाराचं उत्पन्न हे बेसिक एक्झमशन लिमिट पेक्षा जास्त होत आहे

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन २३ जुलै २०२४ च्या आधी (१५% टॅक्स) २३ जुलै २०२४ च्या नंतर (२०% टॅक्स)
१०,००० रुपये १,५०० रुपये २,००० रुपये


यामध्ये हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन २३ जुलै २०२४ च्या आधी झाला असेल तर त्या उत्पन्नावर १५% टक्के टॅक्स आकारला जाईल. म्हणजे दहा हजार रुपयांवरती १५% या हिशोबाने पंधराशे रुपये टॅक्स भरावा लागेल

आणि जो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन २३ जुलै २०२४ पासून नंतर कधीही झाला असेल तर त्या उत्पन्नावर २०% टॅक्स आकारला जाईल. म्हणजे दहा हजार रुपयांवरती २०% या हिशोबाने २००० रुपये टॅक्स भरावा लागेल.

तर मंडळी ही होती Short Term Capital Gain आणि त्यावरील टॅक्स म्हणजे Short Term Capital Gain Tax बद्दलची माहिती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया तुमच्या मित्र मंडळींबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.